देशभरात दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलनं देखील करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पुण्यातील बाजीराव रोडवरच्या शनिपार चौकात आंदोलन करण्यात आलं. मारुती मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी मंदिरा आरती देखील केली. तसेच, मारूती स्तोत्र पठणामध्ये देखील त्या सहभागी झाल्या होत्या. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदींच्या आवाहनानंतर आम्ही सबसिडी मागे घेतली, पण…”

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला आवाहन केली की, गॅस वरील सबसिडी घेऊ नका. त्या आवाहनाला साध देत आम्ही सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असं वाटत होतं. पण असं काही झालं नसून ही दरवाढ वाढत चालली आहे”, असं त्या म्हणाल्या.

सुषमा स्वराज यांच्या भाषणाची आठवण!

दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिवंगत सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण सांगितली. “२०१३-१४मध्ये ज्या पद्धतीने महागाई झाली होती, त्यापेक्षा चारपट महागाई झाली आहे. सुष्माताईंचं भाषण मला मनापासून भावलं होतं. तेव्हा त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होतं की आंकडों से पेट नहीं भरता. जब भूख लगती है तब धान लगता है.. मला देशाच्या पंतप्रधानांना आज हाच प्रश्न विचारायचा आहे की आंकडों से पेट नहीं भरता. जब भूख लगती है तब धान लगता है”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

“…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली भूमिका

“हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. त्या सरकारला सुबुद्धी दे, असं साकडं देवाला घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या देशात जी काही परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाई कशी नियंत्रणात येईल यावर लक्ष देण्याची गरज आहे”, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule targets bjp on inflation rate sushma swaraj dialogue pmw
First published on: 11-05-2022 at 13:12 IST