बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून आज (४ फेब्रुवारी) निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. साताऱ्यातील पोवई नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बंडातात्यांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिलांनी आक्रमक होत बंडातात्यांना काळे फासण्याचा इशारा दिला. मात्र, बंडातात्या पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलक महिलांनी केवळ निवेदन देत गुन्हा दाखल केला.

गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला. बंडातात्यांनी नेत्यांची माफी मागावी, यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या. आज (४ फेब्रुवारी) साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी हातात बंडातात्यांचा निषेध नोंदविणारा फलक घेऊन ‘मुखाने बोलतात रामकृष्ण हरी, त्यांनीच केली बदनाम’, अशी घोषणा देत बंडातात्या कराडकरांचा निषेध नोंदवला.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
What Kishori Pednekar Said About Raj Thackeray ?
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

“बंडातात्यांना अटक करण्याची मागणी”

बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. पक्षाच्या सर्वच ठिकाणाहून महिला सेलच्या पदाधिकाऱ्यांनी बंडातात्यांना अटक करण्याची मागणी केली. साताऱ्यातही महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले.

हेही वाचा : “ही प्रथा पडू नये म्हणून…”; बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकर यांचा इशारा

“अटक न केल्यास बंडातात्या कराडकर यांना कुठेही फिरकू देणार नाही”

विशेषतः महिला नेत्यांबाबतीत केलेला आरोप हा अतिशय घाणरेडा असून त्याची दखल आम्ही सर्व महिला घेत आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर पण टीका केल्यामुळे त्यांना अटक करून गुन्हा दाखल करावा. बंडातात्या कराडकर यांना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली. तसेच अटक न केल्यास बंडातात्या कराडकर यांना कुठेही फिरकू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.