सातारा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने आपली सत्ता अबाधित ठेवत वर्चस्व अधोरेखित केले आहे. मतदानापूर्वीच काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले.
विजयानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या विजयी उमेदवारांसह हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच गावाच्या सर्वागीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही दिले. नागेवाडी ग्रामपंचायतीत अजिंक्य पॅनेलने सर्वच्या सर्व ९ जागा पटकावून प्रतिस्पध्र्याना धूळ चारली. शेळकेवाडी ग्रामपंचायतीवर जानाईदेवी पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले.गवडी, अंधारी, डोळेगाव, बोरगाव, महादरे, कण्हेर, विलासपूर, परळी, सोनगाव सं. िनब, कारंडवाडी, पांगारे या ग्रामपंचायतींवर आ.भोसले गटाने वर्चस्व ठेवले. सर्व विजयी उमेदवारांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2015 रोजी प्रकाशित
साता-यात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
सातारा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने आपली सत्ता अबाधित ठेवत वर्चस्व अधोरेखित केले आहे.

First published on: 07-08-2015 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncps dominance of gram panchayats in satara