लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी. आर.एफ) एक पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिपक शिंदे यांनी दिली.

एन.डी. आर.एफ. च्या पथकामध्ये पथक प्रमुख राजेश येवले व मोहित शर्मा असे दोन अधिकारी व इतर २० जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. सन २०१९ सन २०२१ मधील जुलै महिन्याच्या शेवटी पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.

आणखी वाचा-सांगली: नियमाच्या पायमल्ली करणाऱ्या ३५ खासगी बसवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावाची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी. आर. एक पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.