कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी

नोव्हाव्हॅक्सने मॅट्रीक्स-एम टेक्नोलॉजीने ही लस विकसित केली आहे. मोडर्नाच्या लसीप्रमाणे ही लस सुद्धा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबर अ‍ॅंटीबॉडीजना निष्प्रभावी करेल.

करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

करोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅबवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत असून त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना तपासणीची स्वतंत्र लॅबची मागणी करण्यात आली होती.

आणखी वाचा- Coronavirus : व्हेंटीलेशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षणासाठी वर्धेत अद्यावत केंद्र

अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New coronavirus testing labs in kalyan dombivali mp shrikant shinde eknath shinde jud

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!