यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती नगर जिल्ह्यातील १२ आमदार निवडून आणू असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर निलेश लंके यांनी आज ‘मातोश्री’ या निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

निलेश लंकेंची फटकेबाजी! “किंग होणं सोपं पण किंगमेकर होणं नाही, बाळासाहेब थोरात कृष्णासारखे..”

नेमकं काय म्हणाले निलेश लंके?

या भेटीनंतर मला जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद उद्धव ठाकरे यांनाही झाला आहे. त्यांनी लोकसभेतील विजयासाठी माझं अभिनंदन केलं, असं निलेश लंके म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये प्रचाराला येता आलं नाही. याबाबत उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केली, असंही निलेश लंके यांनी सांगितले.

मविआच्या प्रचाराची सुरुवात नगरमधून होईल

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात आपल्याला नगरमधून करायची आहे. त्यामुळे नगरमध्ये लवकरच मोठा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील, अशी माहितीही निलेश लंके यांनी दिली. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील १२ आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा निर्धार आम्ही केला आहे, असं निलेश लंके म्हणाले.

हेही वाचा – नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला; पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरमध्ये निलेश लंके यांचा विजय

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत होते. त्यापैकी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघही होता. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके आमने-सामने होते. या निवडणुकीत विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, तर निलेश लंके यांचा मोठ्या मताधिक्यानी विजय झाला होता.