महाबळेश्वर येथील दोन वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून आला मात्र याचा नागरिकांना धोका नसल्याने काळजी करण्याचे कारण नसून नागरिकांनी झाडाखालील पक्षांनी खाल्लेली फळे न खाण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. निपाह व्हायरसचा सातारा जिल्ह्याला धोका नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज(मंगळवार) साताऱ्यात सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर, मागील २० वर्षे वटवाघुळांवर संशोधन करत असलेल्या डॉ.महेश गायकवाड यांनी महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह वायरसचे खंडण केले आहे. निपाह व्हायरस बहुतांश इंडोनिशिया, मलेशिया आणि नॉर्थ ईस्ट या भागात आढळतो मात्र आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही वटवाघळात निपाह वायरस आढळला नसल्याचा दावा, त्यांनी केला असून नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, अशा रिपोर्ट्समुळे वन्य जिवांवर घातक असे उपाय केले जातात. वन्यजीव संपल्यास अनेक वायरस मनुष्यांपर्यंत पोहचण्याचा धोका देखील डॉ.महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह’ विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात ‘निपाह व्हायरस’चा शिरकाव; महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू

मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. महाबळेश्वराच्या गुहेत सापडलेला वटवाघुळाच्या तपासणीत हा व्हायरस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासात माहिती समोर आली आहे. महाबळेश्वरमध्ये घेतलेल्या नमुन्यामध्ये निपाह व्हायरस आढळला आहे. यामुळे श्वसनाचा त्रास होऊन मेंदूला सूज येवून मृत्यू होतो.

अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांना सांगितलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो.

निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. करोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता एक ते दोन टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ६५ ते १०० टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.

२०१८ मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचं पाहायला मिळालं होतं –

करोना विषाणूचा प्रसार वटवाघळाच्या माध्यमातूनच झाल्याचं सांगितलं जातं. शिवाय इबोलाचा प्रसार वटवाघळातूनच झाला होता. महाराष्ट्र सध्या करोना महामारीच्या संकटाशी लढा देत आहे. त्यातच आता निपाह विषाणूच्या बातमीने राज्याच्या चिंतेत भर पडणार आहे. २०१८ मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय राज्याच्या सीमा केरळमधील लोकांसाठी बंद कराव्या लागल्या होत्या. केरळमध्ये निपाह विषाणूने आपले भयानक रुप दाखवले होते.याआधी भारतात २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह व्हायरस आढळला होता. तसंच आसाममध्येही निपाहचे रुग्ण आढळून आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nipah virus poses no threat to satara district collector shekhar singh msr
First published on: 22-06-2021 at 22:34 IST