भाजपा आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यातलं वैर महाराष्ट्रातला सर्वश्रुत आहे. नितेश राणे आदित्य ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. तर आदित्य ठाकरे अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. महाविकास आघाडीचं सरकार असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले होते त्यावेळी म्याँव म्याँव अशा घोषणा नितेश राणेंनी दिल्या होत्या. नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं शत्रुत्व आजचं नाही.

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं भांडण

आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात एक भांडण झालं होतं. म्याँव म्याँव हा आवाज जेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून काढला तेव्हा दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्ष असा काहीतरी वाद होण्याची ती पहिली वेळ नव्हती. या दोन तरूण नेत्यांमध्ये असलेल्या वादाचं जे मूळ आहे ते दोघांच्या वडिलांमुळेच म्हणजेच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं जे वैर आहे त्याचमुळे नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करत नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती.

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”

हे पण वाचा- मुख्यमंत्री अमावस्या, पौर्णिमेला शेती करायला जातात – आदित्य ठाकरे

२०११ मध्ये काय घडलं होतं?

आदित्य ठाकरे पदवीधर झाले होते आणि नारायण राणे तेव्हा मंत्री होते. आदित्य ठाकरे महाविद्यालयात जात असताना फार सुरक्षा तेव्हा बाळगत नसत. वांद्रे वरळी सी लिंकवरुन आदित्य ठाकरे यांना त्यांचे कार चालक ठाकूर घेऊन चालले होते. त्यावेळी एका कारच्या कॉनव्हॉयने त्यांच्या कारला कट मारला. कॉनव्हॉयच्या कारमध्ये कोण बसलं होतं? तर नितेश राणे. ठाकूर यांनी आदित्य ठाकरेंची कार थेट पोलीस स्टेशनातच नेली आणि तिथे नितेश राणेंच्या विरोधात तक्रार नोंदवली. मला इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं तेव्हा आदित्य ठाकरेंनी पोलिसांना सांगितलं होतं. या प्रकरणात तेव्हा गृहमंत्र्यांना लक्ष घालावं लागलं आणि प्रकरण मिटवावं लागलं होतं. नितेश राणेही मागे हटले नाहीत त्यांनीही तक्रार केली होती. मात्र दोघांच्या शत्रुत्वाला या प्रसंगामुळे सुरुवात झाली होती.

आज काय घडलं?

नितेश राणे जेव्हा अधिवेशनातून परतत होते तेव्हा त्यांचा सामना आदित्य ठाकरेंशी झाला. आदित्य ठाकरे हसत हसत पुढे गेले तर नितेश राणे यांनी चला चला जागा द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं. आदित्य ठाकरे काहीही न बोलता दुर्लक्ष करुन निघून गेले. अवघ्या दोन सेकंदांसाठी एकमेकांची नजरानजर झाली असावी. पण त्यातही हा प्रसंग दिसून आला. अधिवेशनात या प्रसंगाची चर्चा आता होते आहे.