भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळालं. जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. मात्र त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवल्याने त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब विचारु लागले. मात्र या साऱ्या गोंधळामध्ये नितेश राणेंनी पत्रकारांना पाहून अशी काही कमेंट केली की उपस्थितांमध्ये हशा पिकला.

न्यायालयाबाहेर गोंधळ…
न्यायालयाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. पोलीस गाडीसमोर उभे राहिले आणि ते फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचं सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून १० दिवसांचं संरक्षण दिलेलं असल्याने नितेश राणेंना अटक करता येणार नाही असा दावा राणे समर्थक करत होते.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नक्की वाचा >> अटकेपासून संरक्षण असतानाही नितेश राणेंची गाडी पोलिसांनी न्यायालयाबाहेर का अडवली?; समोर आलं कारण

कशासाठी आम्ही थांबायचं ते सांगा
दुसरीकडे पोलिसांनी वरिष्ठांशी आम्ही चर्चा करत असून अद्याप न्यायायलयाचा निकाल आला नाही असं सांगू लागले. त्यानंतर निलेश राणेंनी निकाल खुल्या न्यायालयात लागला असून तुम्ही अशाप्रकारे एखाद्या आमदाराला थांबवू शकत नाही असं म्हणत रस्ता मोकळा करण्यास सांगितलं. मात्र तरीही पोलीस गाडी समोरुन न हटल्याने, “कशासाठी आम्ही थांबायचं ते सांगा, कोर्टाचा अपमान आम्ही करतोय की तुम्ही,” असा प्रश्न पोलिसांना विचारला.

नक्की वाचा >> नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

चढ्या अवाजात पोलिसांना प्रश्न
यावर पोलिसांनी सहकार्य करा असं सांगताच निलेश राणे, “१० मिनिटांपासून उभाय मी, मी सहकार्य करतोय. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही आमदाराला गाडीत बसवलंय ते सांगा,” असा प्रश्न चढ्या आवाजात विचारला.

“यांची नेहमीची नाटकं आहेत”
यानंतर नितेश राणे गाडीतून उतरुन काही अंतर चालत गेले. यावेळीही त्यांच्याभोवती समर्थकांचा गराडा होता. तसेच पोलिसही त्यांच्यासोबत चालत होते. नितेश राणेंसोबत चालतानाही निलेश राणे हे, “यांची नेहमीची नाटकं आहेत,” असं म्हणत पोलिसांनी केलेल्या अडवणुकीवरुन टीका करताना दिसले.

“आपण काही बोलणार का?”
न्यायालयापासून काही अंतर चालत आल्यानंतर नितेश राणे त्यांच्या कारमध्ये बसायला जात असताना पत्रकारांनी त्यांना घेरलं. “नितेशजी आपण काही बोलणार का?”, असं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळेस नितेश राणेंनी, “माझा जातानाचा व्हिडीओ घ्या,” अशी प्रतिक्रिया दिली. एकीकडे नितेश राणेंना अटक होणार का यासंदर्भातील बातम्या वृत्तवाहिन्यांवर चालवल्या जात असताना, न्यायलयाच्या परिसरामध्ये पोलीस आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे वातावरण तणवापूर्ण झालेलं असताना पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर नितेश राणेंनी दिलेल्या उत्तरामुळे पत्रकारांनाही हसू आलं. “लाइव्ह सुरु आहे,” असं म्हणत पत्रकारानेही नितेश राणेंना उत्तर दिलं.