गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना भाजपा सोडून त्यांच्यासोबत येण्याचं आवाहन केलं होतं. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद असल्याचीही चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर ‘भाजपामध्ये मान-सन्मान मिळत नाही’ असं गडकरींनी आपल्याला सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यापाठोपाठ त्यांनी गडकरींना भाजपा सोडून आपल्यासोबत येण्याचीही ऑफर दिली होती. या ऑफरवर आता नितीन गडकरींनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

उद्धव ठाकरेंची जाहीर ऑफर!

उमरगा येथी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचा उल्ले केला होता. “काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता नितीन गडकरींची प्रतिक्रिया आली आहे.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

उद्धव ठाकरेंच्या ‘ऑफर’वर काय म्हणाले नितीन गडकरी?

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरींना अशा प्रकारे खुली ऑफर मिळाल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत असतात. हे चालतच राहणार आहे. ते आपण विनोदानं घ्यायला हवं. माझी भाजपाशी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाण्याचं कारण नाही. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. फक्त आमच्या विचारांत भिन्नता आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींचे नरेंद्र मोदींशी खरंच मतभेद आहेत? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा…

“त्यांनी आत्तापर्यंत नागपुरात उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे कदाचित निवडणूक बिनविरोध करण्याचं त्यांच्या मनात असू शकतं. किंवा कदाचित ते पुढे उमेदवार जाहीर करू शकतात”, अशीही टिप्पणी गडकरी यांनी केली.

नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव; म्हणाले, ‘दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा’

“भाजपा सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच नाही”

दरम्यान, नितीन गडकरी भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांना मधल्या काळात उधाण आलं होतं. त्यावर गडकरींनी पडदा टाकला. “मधल्या काळात कारण नसताना याबाबतीत बऱ्याच गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून मला आमच्याकडे या अशी ऑफर दिली गेली. पण मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वोपरी आहे. त्यामुळे हा पक्ष सोडून दुसरीकडे कुठे उभं राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांनी या सदिच्छा दिल्या, त्यांना धन्यवाद. पण मी असा कोणताही प्रयत्न कधी करणार नाही. माझ्या सिद्धांताशी तडजोड करणार नाही”, असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.