महाराष्ट्रात आत्ता जे काही घडलं आहे त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारला असता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मात्र या सगळ्याबाबत मी माझी भूमिका आत्ता मांडणार नाही. टिझर, ट्रेलर काहीही देणार नाही तर शिवतीर्थावर २२ मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सभेत थेट सिनेमाच दाखवणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबईत मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी?
महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर मी सविस्तर गुढीपाडव्याच्या दिवशी बोलणार आहे. अजित पवार जे म्हणाले की मनसेचे एका आमदाराने उद्या पक्ष ताब्यात घेतला तर काय? यावर राज ठाकरेंनी एकच सूचक उत्तर दिलं की म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो. २२ मार्चला मी माझी सविस्तर भूमिका मांडतो. जे काही घडलं त्याचा ट्रेलर, टिझर नाही काहीही नाही डायरेक्ट सिनेमाच दाखवायचा आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आत्ता मी या विषयावर काही बोलणारच नाही. महाराष्ट्राचं जे काही राजकारण सुरू आहे त्यात इतकंच म्हणेन की राजकारणाचा चिखल झाला आहे.
विधानसभेत गेलो होतो त्यावेळी मला कळतच नव्हतं की कोण कुठल्या पक्षात आहेे. आमदार आहे असं कुणी सांगत आलं की कुठला? एखाद्या आमदाराला विचारलं तू त्या पक्षात होतास ना? पण तो त्या पक्षात गेला ना असं सांगितलं जातं. बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण झालं त्यावेळी मला खरंच प्रश्न पडला होता की कोण आमदार कुठल्या पक्षात आहे असंही राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.
मराठी भाषा दिनानिमित्त पनवेलमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी “महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झालाय” अशी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे. तसेच, “म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय”, असंही राज ठाकरे म्हणाले.