या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती असूच नये, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.राज्य सरकारने प्रसिद्ध लेखक-प्रकाशक बाबा भांड यांची राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भांड यांच्या नियुक्तीसंदर्भात साहित्य वर्तुळातून टीका होत असताना नेमाडे यांना विचारले असता त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती अध्यक्षपदी असूच नये, असे म्हटले. आरोप असणे आणि ते सिद्ध होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. भांड यांना मी त्यांच्या विद्यार्थिदशेपासून ओळखतो. ते भ्रष्टाचार करतील, असे वाटत नाही, असेही नेमाडे यांनी सांगितले.आरोप असणे व ते सिद्ध होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असू नये. मात्र, व्यवहारात तसे नसते. आरोप असलेले राजकारणी महत्त्वाच्या पदावर असतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not the person alleging
First published on: 17-08-2015 at 03:31 IST