पुण्या-मुंबईबरोबरच कोल्हापूरच्या हिरव्यागार ‘लोकेशन्स’चे दर्शन पुण्या-मुंबईतील चित्रपट व्यावसायिकांना एका ‘क्लिक’वरून घडणार आहे. जुन्या-नव्या चित्रपटांच्या माहितीसह, कोल्हापुरातील अनेक होतकरू चित्रपट कामगार, कलाकार, तंत्रज्ञ यांचीही त्यांच्या फोटोंसह सर्व माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या या वेबसाइटवरून मिळणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
काळाची पावले ओळखून, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मराठी चित्रपट विषयक र्सवकष माहिती देणारी ही वेबसाइट येथील अष्टविनायक मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट यांच्याद्वारे तयार केली आहे. तिचे उद्घाटन मुंबई येथे रवींद्र नाटय़ मंदिरात अभिनेता स्वप्निल जोशी याच्या हस्ते करण्यात आले.
आजकाल मराठी चित्रपट, प्रमोशनमध्ये काही अंशी कमी पडल्यामुळे मायबाप प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचत नाही. इतकेच नाहीतर िहदी, इंग्रजी चित्रपटांच्या स्पध्रेत, भाऊगर्दीत, मराठी चित्रपटांचे अस्तित्व हरवल्यासारखे वाटते. यासाठी मराठी चित्रपट महामंडळ या नावाने वेबसाइट व चित्रपट महामंडळ या नावाने अॅप तयार केले आहे. यामध्ये प्रदíशत झालेले व येणारे चित्रपट त्यांची गाणी, ट्रेलर, सेटवरील गमतीजमती व त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल.
पत्रकार परिषदेला मििलद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुर्के, इम्तियाज बारगीर, सतीश रणदिवे, रवींद्र बोरगावकर आदींसह अष्टविनायकचे संग्राम पाटील, विक्रांत भोसले आदी उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रपटसृष्टीला संजीवनी देणार – पाटकर
हिंदी चित्रपटाच्या ग्लॅमरमध्ये मराठी चित्रपट मागे पडू नये या दृष्टीने ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. कोल्हापुरातही अनेक कलाकार आहेत. यांच्या हाताला काम मिळावे, चित्रनगरीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या उद्देशातून हे एक मोठे पाऊल उचलले आहे. यातून नक्कीच कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची गेलेली रया नक्कीच परत मिळेल, अशी आशा विजय पाटकर यांनी व्यक्त केली.
युवा पिढीसाठी हे अॅप महत्त्वाचे
आजची युवा पिढी चित्रपट निर्मितीच्या टप्प्यावर संधीच्या शोधात आहे. पडद्यावरील, तसेच पडद्यामागील भूमिका यामध्ये त्यांना करिअर करायचे आहे. पण संधी मिळत नाही. अशा युवा पिढीला वेबसाइट व अॅप हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2015 रोजी प्रकाशित
चित्रपटसृष्टीची ‘लोकेशन्स’ आता एका क्लिकवर!
पुण्या-मुंबईबरोबरच कोल्हापूरच्या हिरव्यागार ‘लोकेशन्स’चे दर्शन पुण्या-मुंबईतील चित्रपट व्यावसायिकांना एका ‘क्लिक’वरून घडणार आहे.
First published on: 13-08-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now cinema location with a click