तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठलाचेही टोकन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. एरवी एकदाशीच्या काळात सुमारे २० ते २५ तास दर्शन रांगेत उभे राहून भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते. परंतु, मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांची या त्रासातून मुक्तता होणार आहे. येत्या कार्तिकी वारीपासून याची सुरूवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदिर समितीने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन घेणे सुलभ जाणार आहे. या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो भाविक पंढरपूरच्या बाजारपेठेत फेरफटका मारू शकतो. खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास त्याला मोकळा वेळ मिळणार आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळेल, असे भोसले यांनी म्हटले. भाविकांची सोय कशी होईल. दर्शन रांगेत थांबण्याचा कालावधी कसा कमी करता येईल, याचा विचार करून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणलो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now token method for vitthal darshan pandharpur
First published on: 07-09-2017 at 20:16 IST