सांगली : चिडचिड करते या कारणामुळे वैतागलेल्या वृध्द इसमाने पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचा प्रकार कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे घडला. पत्नीचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगून परस्पर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मुलाच्या तक्रारीनंतर या प्रकरणी वृध्दाला अटक करण्यात आली.

संशयित तानाजी बापु पाटील (वय ७४ रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) हा आपली पत्नी लतिकासह (वय ६३)कुची गावात वास्तव्यास आहे. घरी दोघेच वास्तव्यास असून दोघामध्ये सातत्याने किरकोळ कारणावरून वाद होत होते.

आणखी वाचा-“शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले

दिवाळी सणासाठी नेरूळला जाउ या असा आग्रह पत्नीकडे धरला होता. मात्र पत्नीचा त्याला नकार होता. यातूनही गुरूवारी दोघामध्ये वाद झाला. पत्नी सातत्याने चिडचिड करते, वाद करते या कारणाने पतीने रात्री झोपल्यानंतर पत्नीच्या तोंडावर उशी दाबून मारले. श्‍वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, शेजार्‍यांना व भावकीला त्याने पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, मुलगा प्रविण पाटील याला संशय आल्याने याबाबत अधिक चौकशी केली असता दोघामध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी मुलाने वडिलाविरूध्द आईचा खून केल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली असून संशयितांला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे.