एका खासगी हिंदी वृत्तवहिनीने दाखवलेल्या चुकीच्या मोबाईल नंबरमुळे कोल्हापूरातील एका तरुणाला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्या चॅनेलने चक्क रिया चक्रावतीचा मोबाईल नंबर म्हणून कोल्हापूर येथील सागर सुर्वे याच्या मोबाईल नंबरशी जुळता क्रमांक स्क्रीनवर दाखवला. त्यामुळे रिया चक्रवर्ती म्हणून सागर सुर्वे याला कॉल सुरू झाले.

अभिनेता सुशांतसिहच्या आत्महत्येनंतर अनेकांची चौकशी सुरू झाली.त्यात रिया चक्रवर्ती हिची चौकशी खूप सखोल होत आहे. तिचे कॉल रेकॉर्डिंग काढले जात आहे. याचाच फटका एका सर्वसामान्य तरुणाला बसला.काही दिवसांपूर्वी एका खासगी हिंदी टीव्ही चॅनेलने स्क्रिनवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून नंबर दाखवला.रियाच्या नंबरशी साध्यार्म्य असलेला केवळ एक अंक बदल असलेला नंबर सागर सुर्वे नावाच्या तरुणाचा आहे.गेल्या काही दिवसांपासून सागरला सतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज येत आहे.

‘रियाशी बोलायचं आहे.तुझे फोटो पाठव’ यासह काही अश्लील मेसेज देखील यायला सुरुवात झाली. सुरुवातीला सागरला काही समजले नाही.पण एका वाहिनीवर दाखवलेला रियाचा नंबर आणि सागरच्या नंबरमध्ये शेवटी एका अंकाचा फरक असल्याचे लक्षात आले.शेकडो कॉल आणि मेसेज यायला सुरुवात झाली.नंबर ब्लॉक केले पण व्हाट्सआपला मेसेज, व्हिडीओ कॉल येऊ लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी सागर यांना त्यांचा नंबर ब्लॉक करावा लागला.सागर हे सरकारी नोकरीत आहेत. कामाच्या ठिकाणीही फोन येणं सुरूच होतं. कित्येकदा तणावाखाली जाऊन सागर यांनी फोन स्विच ऑफ केला. पण फोन सुरू होताच पुन्हा बेल वाजायची.शेवटी सागर यांनी तो नंबर कायमचा बंद करून टाकला.सरकारी नोकरीत असल्याने सागर सुर्वे यांचा नंबर सर्व ठिकाणी देण्यात आला आहे. सुशांतसिह आत्महत्येचा तपास करताना झालेल्या चौकशीचा सागर यांना फटका बसला. हा नंबर बंद ठेवल्याने काम करताना देखील सागर यांना अडचणी येत आहेत.