आठ महिन्यापूर्वी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्तास्थापन केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीने निधी देण्याबाबत सातत्याने शिवसेनेतील आमदारांवर अन्याय केला. राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यालाही कोट्यवधींचा निधी दिला जातो. पण, शिवसेनेतील आमदारांना निधी मिळला नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. बंडखोरी होण्यामागेही हेच कारण असल्याचं शिंदे गटातील आमदार सातत्याने सांगत असतात. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “हा धादांत खोटा आरोप आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेला गट, आपण का बंडखोरी केली, हे कारण सांगण्यासाठी असं बोलतो. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींचा निधी देण्याबाबत सांगितलं होतं. पण, कारण नसताना तसं बोललं गेलं.”

हेही वाचा : “अरे तू एका बाईसमोर हरला”, राणेंवर केलेल्या अजित पवारांच्या टीकेला दीपाली सय्यद यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेते होते. ते म्हणायचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला इतका-इतका निधी मिळाला. मग परवाच्या पुरवणी मागणीत ८३ टक्के रक्कम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांच्या विभागाला देण्यात आला. तर, शिंदे गटातील मंत्र्यांच्या विभागाला केवळ १७ टक्केच रक्कम मिळाली,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : गुलाबराव पाटलांनी नागालँडचा मुद्दा काढताच अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यांना आम्ही ओळखतो, प्रत्येक गोष्टीत…!”

“जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकास, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाला तुम्हाला पैसे द्यावेच लागतात. त्याशिवाय विकासकामे करू शकत नाहीत. आता आम्ही म्हणायचं का एकनाथ शिंदेंना कमी आणि भाजपाला जास्त पैसे मिळाले. शेवटी विभाग कोणाकडे असतो हे महत्वाचं आहे,” अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ajit pawar on shinde group mla allegation funds ssa
First published on: 09-03-2023 at 13:21 IST