सोलापूर : सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गणेश कैलास नरळे आणि विष्णू चंद्रकांत बरगंडे यांना गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याबद्दल पीडित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, सध्याचे तपास अधिकारी तथा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पूर्वीचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी प्रकरणाबाबत केलेल्या पूर्व-निर्धारित त्रुटीबाबत काय तपास केला, याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी गणेश नरळे (वय २९) आणि विष्णू बरगंडे (वय ४०, रा. आवसे वस्ती, सोलापूर) यांच्या विरूध्द एका तरूणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. परंतु पूर्वीचे तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांनी आरोपी  विष्णू बरगंडे याच्या विरुद्ध पुरावा मिळून आला नसल्याचे नमूद करीत त्याला दोषारोप पत्रातून वगळले होते.  तर आरोपी गणेश नरळे याच्या विरुद्ध किरकोळ फसवणुकीच्या गुन्ह्या अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात  तपास अधिकारी बदलून अन्य तपास अधिकाऱ्याकडे तपास हस्तांतर करावा व प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी विनंती पीडितेने केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to investigating officer to file affidavit regarding criminal investigation of mass atrocities ysh
First published on: 18-03-2023 at 22:06 IST