करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीतही सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्तिकी वारीकाळात म्हणजेच २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबपर्यंत चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तसेच २५ ते २७ नोव्हेंबर असे तीन दिवस श्रीविठ्ठल आणि रुख्मिणीमातेचे मुखदर्शन बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांनी पंढरीत येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिवाळी पाडव्याला राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली. मात्र, करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने कार्तिकी वारीत पंढरीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

दुसरीकडे फक्त पंढरपूरचे रहिवासी असलेल्यांना एस.टी.मधून पंढरीस येता येईल. इतरांना प्रवेशबंदी राहणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दि. २६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी यात्रा कालावधीत पंढरीला येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orientation of shri vitthal in karthiki wari abn
First published on: 23-11-2020 at 00:07 IST