पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंचाड येथील मयुरवन रिसॉर्ट येथे १०० ते १२५ पर्यटकांची गर्दी झाल्याने, तसेच करोना संक्रमणाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत दक्षता न घेतल्याने संबंधित रिसॉर्ट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी वाडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड यांनी कंचाड येथील या रिसॉर्टला भेट दिली असता, तेथे १०० ते १२५ पर्यटक करोना संदर्भातील शासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांची पायमल्ली करून एका स्विमींग पूलमध्ये खेळताना आढळून आले.

या प्रकाराबाबत या रिसॉर्ट मालकावर व चालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करुन, वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.