पालघर येथून आज दिवसभरात उत्तरप्रदेशला जोनपूर, वाराणसी, सुल्तानपूर येथे जाणाऱ्या तीन श्रमिक स्पेशल ट्रेन सोडणार असल्याने,  येथील आर्यन शाळेच्या मैदानावर टोकन घेण्यासाठी स्थलांतरितांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली.

पालघर व परिसरातून शेकडोच्या संख्येने स्थलांतरित  पालघर शहरातील आर्यन मैदानावर दाखल होत आहेत. पालघरहून श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार असल्याने ही गर्दी होत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात आहेत. मात्तर स्थलांतरितांची शेकडोंच्या संख्येत असेलेली ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसून आले.

एवढी मोठी गर्दी हाताळताना महसूल प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली. तर, मैदानावर सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाला . टोकन घेण्यासाठी ही गर्दी होत असताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील बळावत  आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.