पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा (वय ६१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकतेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
घोडा १९८८ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथम ते डहाणू मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून १९९९ व २००४ या दोन निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून झाले. गतवर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शनिवारी रात्री मनोरजवळ एका लग्न सोहळ्यातून घरी परतताना चारोटी नाक्याजवळ त्यांना  हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रानशेत (डहाणू) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
 चार आमदारांचे निधन
गेल्या नोव्हेंबरमध्ये तेरावी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत चार आमदारांचे निधन झाले आहे. निकालानंतर  भाजपचे आमदार गोविंद राठोड यांचे निधन झाले. राठोड यांनी आमदारकीची शपथही घेतली नव्हती. त्यानंतर शिवसेनेचे वांद्रे मतदारसंघाचे आमदार बाळा सावंत तर तासगावचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन झाले.  या तिन्ही आमदारांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तिघांचेही नातेवाईक निवडून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar mla krushna ghoda dies of heart attack
First published on: 25-05-2015 at 12:54 IST