पालघर ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालयात सील करण्यात आले असून याठिकाणी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णाला मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना बाधितांकरिता समर्पित उपचार केंद्र म्हणून कार्यरत असणाऱ्या पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णालयाच्या अंतर्गत उपचार घेत असलेल्या इतर आजारांच्या रुग्णाला रविवारी सायंकाळी मनोर येथे हलवण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयातील सुमारे २० कर्मचाऱ्यांना पालघर पणेरी जवळील साईबाबा नगर येथील क्वारंटाइन कक्षामध्ये रात्री हलविण्यात आले असून त्यांच्या घशाच्या नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar rural hospital staff affected by corona virus patients moved to the manor aau
First published on: 25-05-2020 at 08:44 IST