पंढरपूर : येथील ‘प्रभा हिरा प्रतिष्ठान’ संचलित ‘पालवी’ संस्थेच्या डिंपल घाडगे व तेजस घाडगे यांना ‘फोर्ब्स वुई सर्व्ह इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

देशातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चार विभागांतून या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींना नामांकित केले जाते. देशभरातील प्रतिष्ठित परीक्षकांद्वारे नामांकित व्यक्तींमधून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे हा पुरस्कार सोहळा झाला.फोर्ब्स इंडिया-वुई सर्व्ह इंडिया, नेटवर्क १८ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वुई सर्व्ह इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. महिला सक्षमीकरण, गरिबांना शिक्षण देणे, पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, कृषी आणि जलसंधारण, आरोग्य सेवा आणि स्वच्छता शिक्षण, सामाजिक न्याय, सामाजिक उद्योजकता इत्यादी क्षेत्रांत कार्यरत राहून, समाजामध्ये सकारात्मक परिणाम निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागचा उद्देश आहे.

देशातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चार विभागांतून या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींना नामांकित केले जाते. देशभरातील प्रतिष्ठित परीक्षकांद्वारे नामांकित व्यक्तींमधून पुरस्कारासाठी निवड केली जाते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यास आमदार पी. विष्णु कुमार राजू, आमदार पल्ला श्रीनिवास राव, आमदार गौथू सिरीषा यांच्यासह लायन्स क्लब इंटरनॅशनलचे देश पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

यावर्षी पंढरपूरमधील ‘पालवी’ संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांची या देशपातळीवरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या वतीने पालवी संस्थेच्या डिंपल घाडगे व तेजस घाडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पालवी परिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.