Video: ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग; पंकजा मुंडेंकडून गरब्यादरम्यान करोना नियम धाब्यावर

भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी करोनासंदर्भातील नियमांची काळजी घ्यावी असं आवाहन नुकतच पंकजा यांनी केलं होतं.

pankaja munde
परळीमध्ये त्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला उपस्थित राहून गरबा दांडियाचा आनंद घेतला. पंकजा यांचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पंकजा परळीत दाखल झाल्या. दसऱ्याला शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहखासतर पंकजा मुंडेंनी दांडियाला उपस्थिती लावली. यावेळी चिमुकल्याबरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. मात्र त्याचवेळी या ठिकाणी करोनासंदर्भातील नियमांचे फज्जा उडाल्याचं चित्र पहायला मिळालं. पंकजा यांनी स्वत: गरबा खेळताना मास्क लावलं नव्हतं तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं या कार्यक्रमाच्या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

करोनासंदर्भातील काळजी दसरा मेळाव्यादरम्यान घ्यावी असं आवाहन
पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याला भगवान गडावर पुरेशी काळजी घेऊन येण्याचं पंकजा मुंडेनी आवाहन केले आहे. “१५ ऑक्टोबर रोजी आपल्या सर्वांचा दसरा मेळावा आहे आणि आपण त्यासाठी उस्तुक आहाता याची मला पूर्ण कल्पना आहे. १५ ऑक्टोबर रोजी भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव येथे आपण सर्व जण भक्ती आणि शक्तीची परंपरा जपण्यासाठी येणार आहात. मला तुमची काळजी असल्याने मी विनंती करते ११ ते ११.३०च्या दरम्यान, सभेच्या ठिकाणी थांबावे. घरातून निघताना शिदोरी बांधून घ्यावी. सोबत पाणी असू द्या. करोनाचे संकट जरी टळले असले तरीही आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. प्रत्येकाने मास्क सोबत घेऊन यायचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि प्रशासना मदत करण्याच्या भूमिकेमुळे मागच्या वर्षी पहिल्यांदा आपला प्रत्यक्षात मेळावा झाला नाही. त्यामुळे मला आपल्याशी खूप बोलायचे आहे. तुमचेही ऐकायचे आहे आणि मलाही बोलायचे आहे. मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे आपण पालन करावे,” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pankaja munde dance in garba no corona rules fallowed scsg

फोटो गॅलरी