जिल्हा प्रशासनाचे खासगी डॉक्टरांना आवाहन

अलिबाग – राज्यातील इतर भागांप्रमाणेच रायगड जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली आहे. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. हीबाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील तापसरीची लक्षणे असलेल्या, त्याचबरोबर करोनाची इतर लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खाजगी डॉक्टर तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, खालापूर, पेण, अलिबाग आणि रोहा तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८४१ करोनाचे सœीय रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीत १ हजार १६६ तर पनवेल मनपा हद्द वगळून इतर क्षेत्रातील ६७५ रुग्णांचा समावेश आहे.

सô:स्थितीत राज्यामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यानुषंगाने जिल्हयामध्ये सर्व तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.

जिल्हयामधील खाजगी रुग्णालयात, क्लिनिकमध्ये तापाचे रुग्ण तपासणीसाठी आले असता अशा रुग्णांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता याची नोंद घेवून त्यांना जवळच्या खाजगी, सरकारी कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याबाबत रुग्णांना सर्व खाजगी डॉक्टरांमार्फत सूचना देण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. .

तपासणीनंतर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जवळच्या जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तात्काळ कळविण्यात यावे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती यांची देखील तात्काळ तपासणी करण्यात यावी. संबंधित बाधित रुग्ण अथवा संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती सहकार्य करीत नसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय डॉक्टरांना कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षांना केले आहे.