बिहार केडरचे २००६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असणाऱ्या शिवदीप वामनराव लांडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. लांडे यांना महाराष्ट्र सरकारने दहशतवादीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त केलं आहे. पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक म्हणून गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करण्यासाठी ओळखले जाणारे लांडे यांना सध्या महाराष्ट्रामध्ये प्रतिनियुक्ती म्हणून पोस्टींग देण्यात आलं आहे. सध्या ते हैदराबादमध्ये एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. ९ ऑक्टोबरला प्रशिक्षण संपल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भातील अकोला जिल्ह्यात राहणारे लांडे हे अमली पदार्थांसंदर्भातील शाखेमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम करायचे. या कालावधीमध्ये त्यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकले होते. एका छाप्यादरम्यान त्यांनी दोन कोटींची अमली पदार्थ ताब्यात घेत सर्वाधिक किंमतीची माल पकडण्याचा विक्रम नोंदवला होता. आपल्या नव्या नियुक्तीसंदर्भात लांडे यांनी न्यूज १८ शी बोलताना, “सरकारने माझ्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी टाकली असून मी ती प्रमाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patna bihar cadre ips officer shivdeep lande appointed as dig of anti terrorist squad by maharashtra government scsg
First published on: 18-09-2020 at 10:37 IST