Petrol Diesel Price Changes In Maharashtra : आज २७ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price Changes ) जाहीर करण्यात आले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज आपल्यातील अनेक जण दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडतील. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या बाईक किंवा चारचाकी गाडीत पेट्रोल व डिझेल आहे का हे तपासून घ्या. तसेच तुमच्या शहरांत इंधनाचा दर काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊन पेट्रोल व डिझेलची टाकी फूल करून घ्या.
पेट्रोल-डिझेलचे आजचे नवीन दर (Petrol Diesel Price Changes) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.५६ | ९१.०८ |
अकोला | १०४.२८ | ९०.८४ |
अमरावती | १०४.८६ | ९१.३९ |
औरंगाबाद | १०४.३४ | ९०.८६ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८८ | ९२.३५ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.४१ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९१.४१ |
धुळे | १०४.१० | ९०.६४ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.३४ | ९०.८७ |
जालना | १०५.८३ | ९२.२९ |
कोल्हापूर | १०५.३६ | ९१.८७ |
लातूर | १०५.१६ | ९१.६७ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९६ | ९०.५२ |
नांदेड | १०५.७६ | ९२.२६ |
नंदुरबार | १०५.१४ | ९१.६४ |
नाशिक | १०४.४७ | ९०.९९ |
उस्मानाबाद | १०४.८३ | ९१.३६ |
पालघर | १०३.९४ | ९०.४४ |
परभणी | १०६.४१ | ९२.८६ |
पुणे | १०४.१४ | ९०.६६ |
रायगड | १०३.६९ | ९०.२१ |
रत्नागिरी | १०५.५७ | ९२.०७ |
सांगली | १०३.९६ | ९०.५३ |
सातारा | १०४.६८ | ९१.२१ |
सिंधुदुर्ग | १०५.८९ | ९२.३८ |
सोलापूर | १०४.६९ | ९१.२२ |
ठाणे | १०३.५१ | ९०.०३ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०५.२२ | ९१.७३ |
नेहमीप्रमाणे देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. त्यानंतर हे दर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. कारण – पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात.आज महाराष्ट्रातील काही शहरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण – अनेक शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दारात घसरण (Petrol Diesel Price Changes ) पाहायला मिळाली आहे. पण, मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे.
घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल व डिझेलचा भाव :
तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही RTO ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्डची माहिती देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी तुम्ही परवान्यासाठी अर्ज करू शकता, पण तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल, ज्यावर OTP येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्राधिकरणाकडे शुल्क जमा केल्यानंतर तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता.