scorecardresearch

Wardha Car Accident: भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत

वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.

वर्धा देवळी मार्गावर मध्यरात्री दीड वाजता हा भीषण अपघात घडला. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

Maharashtra Wardha Car Accident : वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे विद्यार्थी होते. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा – वर्ध्यात झायलो पुलावरुन कोसळून भीषण अपघात; मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, मृतांमध्ये आमदारपुत्राचाही समावेश

कसा झाला होता हा अपघात?

वर्धा देवळी मार्गावर मध्यरात्री दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा इथल्या दुभाजकाला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास अपघात झाल्याचं लक्षात आलं. त्याने याबद्दल सावंगी पोलिसांना माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi 2 lakh each from pmnrf wardha car accident vsk