शाळेत जायला लागल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात कवितेचाही प्रवेश होतो. अनेक जण काव्याच्या या तरल प्रदेशात हरखून जातात, काही जण कवीही होतात. कवितेच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेचा धांडोळा घ्यावा, असे वाटतेच. त्यासाठी आज, दि. १४ मे रोजी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले असून त्याचा समारोप डॉ. ढेरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘मराठी कवितेची परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet dr aruna dhere in loksatta gatha maharashtra sgy
First published on: 14-05-2021 at 14:19 IST