scorecardresearch

पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता बंद राहणार; दुरुस्तीच्या कामांसाठी बांधकाम विभागाचा निर्णय

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळणल्यामुळे घाट रस्त्यावर असलेल्या पाण्याचा निचरा करणाऱ्या मोऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते

पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता बंद राहणार; दुरुस्तीच्या कामांसाठी बांधकाम विभागाचा निर्णय
पोलादपूर महाबळेश्वर रस्ता बंद राहणार (संग्रहित छायाचित्र)

पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्ग उद्या ४ जानेवारी २०२३ रोजी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रस्त्याचे दुरुस्ती काम केले जाणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.

हेही वाचा- अजित पवारांनी संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून मांडली भूमिका, म्हणाले “अण्णाजी पंतांचे समर्थक…”

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे घाट रस्त्यावरील असलेल्या पाण्याचा निचरा करणाऱ्या मोऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गाळ आणि दगड गोटे साचल्याने मोऱ्यामधील पाण्याचे प्रवाह बंद झाले होते, त्यामुळे पुढील पावसाळ्यापुर्वी या सर्व मोऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हीबाब लक्षात घेऊन महाबळेश्वर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा- महावितरण आर्थिक अडचणीत, केवळ ११ टक्के वसुली; राज्यातील कृषिपंपांच्या चालू देयकांच्या वसुलीवरही प्रश्नचिन्ह

बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत मोऱ्या खोदून त्या ठिकाणी पाईप टाकण्याची कामे केली जाणार आहे. या कामांसाठी पोलादपूर कडून महाबळेश्वरकडे जाणारी आणि महाबळेश्वर कडून पोलादपूरकडे येणारी वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे पोलादपूर आणि महाडकडून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांनी या कालावधीत रस्त्याचा वापर टाळावा, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 09:32 IST

संबंधित बातम्या