न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात आली. मानवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दत्तराव जनार्दन जायभाये, असे आरोपीचे नाव आहे. परभणी येथील एका हॉटेलात लाच घेताना त्याला पकडण्यात आले.
मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावले होते. ते न बजावता अटक टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी आरोपी जायभाये याने केली. यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. त्यानुसार सोमवारी सकाळी जिंतूर रोडवरील हॉटेल जगदंबा येथे सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक जायभाये याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. हा सापळा पोलीस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2014 रोजी प्रकाशित
पाच हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटकेत
न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात आली.
First published on: 02-12-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest in corruption