सांगली : सांगलीतील संस्थान गणेश विसर्जन सोहळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडून शहरातील प्रमुख मार्गावर पथसंचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, गुरुवारी दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८५६ गणेश मूर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.

सांगलीतील स्टेशन चौक येथून पोलिसांच्या पथसंचलनास सुरुवात करण्यात आली. राजवाडा चौक, कापड पेठ, टिळक चौक, हरभट रोड ते मारूती मंदिर या मार्गांवर पथसंचलन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक सुहास भालेराव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते.

सांगलीच्या संस्थान गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा रविवारी साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळा राजवाड्यातील दरबार हॉलपासून दुपारी सुरू होणार असून, राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणेश मंदिर ते टिळक चौक हा विसर्जन सोहळ्याचा मार्ग आहे. या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. सायंकाळी सरकारी घाटावर संस्थान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८५६ गणेश मूर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. यापैकी १७ श्रींच्या मूर्ती दान करण्यात आल्या. महापालिकेने विसर्जन करण्यासाठी तयार केलेल्या विसर्जन कुंडात ३६९ नदीपात्रात १७९, गणेश तलावात २८० तर विहिरीत २८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी तीनही शहरांत २७ टन निर्माल्य संकलित झाल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

सांगलीच्या संस्थान गणेश विसर्जन मिरवणूक राजवाड्यातील दरबार हॉलपासून दुपारी सुरू होणार असून, राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणेश मंदिर ते टिळक चौक हा विसर्जन सोहळ्याचा मार्ग आहे. या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. सायंकाळी सरकारी घाटावर संस्थान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.