शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावून महाविकास आघाडी सरकारला झटका देऊन गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता.महाबळेश्वर) येथील बंगल्यावर वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून ठेवण्यात आला आहे. मात्र हा नियमीत पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.

कोणताही बंदोबस्त हलवला अथवा काढण्यात आलेला नाही. ते महाराष्ट्राबाहेर गेले त्या दिवसापासून वाई उपविभागातून नियमित पाच पोलीस कर्मचारी व बीटच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असल्याचे वाई उपविभागाच्या उपअधीक्षक डॉ शीतल जानवे- खराडे यांनी सांगितले.

गावातील घराचा बंदोबस्त हटवण्यात आल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकारण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती. सातारा जिल्ह्यातील दरे तांब (ता. महाबळेश्वर)हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे नेहमी येणे-जाणे असते. 

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर, घरावर हल्ला चढवला जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ लावलेले फ्लेक्स फाडून टाकले आहेत. काहींना काळंही फासलं जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने बंडखोर आमदारांनी चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान त्यांच्या मूळ गावी असणाऱ्या घरा समोरील बंदोबस्त काढण्यात आलेला नाही चुकीची माहिती बाहेर पसरवली जात असल्याचे वाईच्या पोलीस उपाधीक्षक डॉ शितल जानवे खराडे यांनी सांगितले.