काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आता मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात पप्पू हाय हाय…अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

मनसे कार्यकर्त्यांना चिखलीतच अडवण्यासाठी बुलाढाणा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. चिखली ते शेगाव या मार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस तैनात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींची सभा उधळण्यासाठी मुंबईवरून मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी औरंगाबादमार्गे शेगावकडे निघाले आहेत. औरंगाबादहूनही अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत. शिवाय चिखलीतही बुलढाणा येथील मनसे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.