आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही जागावाटपाची प्रक्रिया पार पडलेली नाही. महाविकास आघाडीत तर जागावाटपावरून चांगलाच वाद चालू असल्याचे दिसतेय. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच महाविकास आघाडीच्या (मविआ) कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नका, असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलाय. त्यानंतर आता आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय. मविआच्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात ५ जागांवरून भांडण चालू आहे, असं त्यांनी म्हटलंय. ते ४ मार्च रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आयोजित केलेल्या एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ५ जागेवरून भांडणं चालली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जातंय की वंचित बहुजन आघाडीने किती जागा मागितल्या हेच समजत नाहीये. वंचित बहुजन आघाडी बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का? अशी चर्चा केली जात आहे.

solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

“१२ ते १६ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता”

“आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांचे भांडण संपल्यानंतर आमच्याशी चर्चा चालू होईल. त्यांचीच भांडणं संपलेली नाहीत तर मग आमच्याशी काय चर्चा होणार आहे. १२ ते १६ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यांची भांडणं संपतील आणि ते आमच्यासोबत चर्चेला बसतील अशी अपेक्षा आहे. यांची भांडणं मिटलेली नसताना ते आम्हाला बोलावतात. आम्हीदेखील बैठकीला जातो. त्या बैठकीत आम्ही विचारतो की तुमचं भांडण संपलं का? ते म्हणतात आमचं भांडण संपलेलं नाही. मग आम्ही सांगतो की आम्ही पुढच्या बैठकीला येतो, असं सगळं चालू आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मविआ वंचितला ४ ते ५ जागा देणार?

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना मविआच्या बैठकांना जाऊ नका असा आदेश दिल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडी मविआमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न विचारला जातोय. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर काँग्रेसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. लवकरच हा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले होते. तसेच ताज्या प्रतिक्रियेत त्यांनी मविआ वंचित बहुजन आघाडीला ४ ते ५ जागा द्यायला तयार आहे. २ दिवसांत निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.