scorecardresearch

Premium

“मीच ओबीसी लढ्याचा जनक”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, मंडल आयोगाचा उल्लेख करत म्हणाले…

इतिहास पाहिला तर मीच ओबीसींच्या लढ्याचा जनक असल्याचं दिसेल. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Prakash AMbedkar
प्रकाश आंबेडकर यांनी आज महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या फुले वाड्यात जाऊन अभिवादन केलं. (PC : Prakash Ambedkar Facebook)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. येत्या सहा डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करू शकता. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काहीही होऊ शकतं, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात मुस्लीम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केलं जात आहे. समाजांमध्ये अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्या लोकांचा त्यासाठी वापर केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी मुस्लीम संघटनांची मुंबईत एक बैठक पार पडली. मुस्लीम संघटना आठ डिसेंबर रोजी पॅलेस्टाईनच्या विषयावर सभा घेणार आहेत. मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजपा त्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे.

prakash ambedkar
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं काय झालं? प्रकाश आंबेडकरांनी दिलं उत्तर; म्हणाले, “आम्ही त्यांना…”
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in Marathi
MPSC मंत्र : इतिहास प्रश्न विश्लेषण
Nirmala SitharamanPrakash Yashwant Ambedkar
“केवळ ज्ञान पाजळायचं…”, प्रकाश आंबेडकरांचा अर्थमंत्र्यांवर हल्लाबोल; ‘त्या’ माहितीबाबत संशय व्यक्त करत म्हणाले…
Vanchit Bahujan Aghadi
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, “वंचितचा समावेश अद्याप ‘मविआ’त नाही, भाजपा व संघविचारसरणी विरोधात…”

दरम्यान, यावेळी पत्रकांनी प्रकाश आंबेडकर यांना राज्यात चालू असलेल्या ओबीसी आंदोलनाबाबत आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारली. यावर आंबेडकर म्हणाले, “कालच्या सभेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.” राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ओबीसी आंदोलन चालू आहे. भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकरांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला कोणाची गरज नाही. आंबेडकरवाद, फुलेवाद, शाहूवाद हा एवढा सक्षम आहे की त्याला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. त्या विचारात एवढी ताकद की ते शाश्वत आहे.

हे ही वाचा >> “६ डिसेंबरनंतर देशात…”, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती, म्हणाले, “ओबीसींचं आरक्षण…”

दरम्यान, आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, छगन भुजबळ हे ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत म्हणून तुम्ही त्या आंदोलनात सहभागी होत नाही, असं बोललं जात आहे. यावर काय सांगाल. या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुम्ही पत्रकारांनी तुमचा इतिहास विषय सुधारून घ्यायला हवा. तुम्ही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रातला जो ओबीसींचा लढा चालू आहे, या लढ्याचा जनक हा प्रकाश आंबेडकर आहे, हे लक्षात ठेवा. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. भुजबळांवरच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझी त्यांच्यावर कसलीच नाराजी नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar says i am father of obc movement asc

First published on: 28-11-2023 at 16:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×