लोकसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असून पहिल्याच दिवशी काँग्रेसच्यावतीने विद्यमान खासदार तथा केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे धुमशान उद्यापासून सुरू होत असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपालाही बंडखोरीची लागण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मतदार संघात भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेस असा सरळ सामना होणार असला,तरी मदानात उमेदवारांची मांदियाळी मोठय़ा प्रमाणात दिसण्याची चिन्हे आहेत. आम आदमी पक्षाने महिलेला संधी देत सांगलीतील उमेदवारी अॅड. समिना खान यांना जाहीर केली असून डाव्या लोकशाही आघाडीच्यावतीने अॅड. के.डी.िशदे, बहुजन समाज पार्टीच्यावतीने माजी महापौर प्रा. नितिन सावगावे हे मदानात उतरणार आहेत. त्या त्या पक्षाने त्यांची उमेदवारी या पूर्वीच जाहीर केली आहे.
तथापी काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक अल्लाउद्दीन काझी, प्रदेश काँग्रेसचे माजी पदाधिकारी दिगंबर जाधव यांनी बंडखोरी करण्याची तयारी जाहीर केली आहे. याच बरोबरच उपऱ्या उमेदवाराला भाजपाने उपकृत करीत संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ आ. संभाजी पवार यांच्या गटाकडूनही उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संदर्भात सोमवारी रात्री पदाधिकाऱ्यांची बठक झाली असून लवकरच उमेदवारीची घोषणा करण्यात येईल, असे आ. पवार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2014 रोजी प्रकाशित
प्रतीक पाटील आज अर्ज दाखल करणार
लोकसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असून पहिल्याच दिवशी काँग्रेसच्यावतीने विद्यमान खासदार तथा केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.

First published on: 19-03-2014 at 03:46 IST
TOPICSनामांकन
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratik patil will be nominations today