– विजय पाटील

सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसाने सातारा व कराडमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. वेगवान वारे आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. झोपड्या, पत्र्याची घरे, उभी पिके जमीनदोस्त झाली. सर्वत्र पाणीच पाणी होऊन झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. इंटरनेट सेवाही बंद पडली आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

उष्म्याचा पारा चढा राहताना परवा बुधवारी पाटण तालुक्यात ठिकठीकाणी वादळी पावसाने दैनावस्था केली होती. कालही (गुरुवारी) अनेक ठिकाणी कमालीच्या उष्म्यानंतर सायंकाळी ढग दाटले होते. समाजमनाची आज उन्हाने तगमग होत असतानाच संध्याकाळच्या सुमारास पूर्वेच्या बाजूने पावसाचा तुफान मारा झाला. अशातच सुसाट वाऱ्याने आणि मधूनच कडाडणाऱ्या विजांनी लोक भयभीत झाले होते. अनेक ठिकाणी गारांचा तडाखाही बसला. अस्मानी संकट कोसळल्याचे वातावरण निर्माण होताना तास-सव्वातास राहिलेल्या या वादळी पावसाने झोपड्या, मातीची घरे उध्वस्त झाली. पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडताना विजेचे खांब जमिनीवर वाकले. त्यात विजेचा आणि इंटरनेटचा खेळखंडोबा झाला. ठिकठिकाणची वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील वाहतूकही खोळंबली होती.

PHOTOS : सातारा, कराडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावासाची जोरदार हजेरी; महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला फटाका!

या पावसाने आंबा, फणस, कांदा, टोमॅटो उत्पादकांचे कंबरडेच मोडले. सातारा, कराड, म्हसवड, खटाव आदी ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. या आपत्तीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कुस्ती मैदानाचा झाला चिखल –

सातारा येथे रंगलेले महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा चिखल झाल्याने आजच्या लढती स्थगित झाल्या. उद्या शनिवारी अंतिम लढत होणार होती. पावसाने या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे सध्या हजारो मल्ल व कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला आहे. या सर्वांना आता संयोजकांच्या पुढील धोरणाकडे लक्ष लागून राहिले आहे.