पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात माजी कृषिमंत्री व खासदार शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना शुक्रवारी डॉक्टरेट दिली जाणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुलगा, खासदार अभिजित मुखर्जी यांनाही ही पदवी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे खुद्द राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हे पदवीदान केले जाणार आहे.
राष्ट्रपती दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात ते शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्याला राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह कुलपती डॉ. डी. वाय. पाटील आणि कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील हेही उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात तिघांना ‘डॉक्टरेट’ दिली जाणार आहे. त्यात त्यांचा मुलगा अभिजित यांचाही समावेश आहे. यापैकी शरद पवार यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी, तर डॉ. माशेलकर आणि अभिजित मुखर्जी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली जाणार आहे. पवार आणि माशेलकर यांचे महाराष्ट्राच्या तसेच, देशाच्या प्रति त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील योगदान ज्ञात आहे. अभिजित यांच्या योगदानाबाबत महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. त्यामुळे पवार आणि माशेलकर यांच्या बरोबरीने राष्ट्रपतींच्या मुलाला पदवी का दिली जात आहे, हा अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रपती मुलाला ‘डॉक्टरेट’ देणार!
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात माजी कृषिमंत्री व खासदार शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना शुक्रवारी डॉक्टरेट दिली जाणार आहे.

First published on: 26-06-2015 at 03:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee to give doctorate degree to his son