सांगली: आटपाडी बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये ड्रॅगन फ्रुटला किलोला १२१ रूपयांचा दर मिळाला. याच बरोबर डाळिंबाला प्रतिकिलो २५१ रूपयांचा सर्वोच्च दर मिळाला.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती सौदे बाजारात आज डाळिंबासह आज ड्रॅगन फ्रुटची देखील आवक झाली. पंढरीनाथ नागणे यांच्या पुढाकारातून मंगलमूर्ती उद्योग समुहाच्या माध्यमातून डाळिंबासोबत इतर फळांचे सौदे सुरू झाले.आज त्यात ड्रॅगन फ्रूटची भर पडली.

former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही भात लावणीत मग्न

टेंभू योजनेचे पाणी आल्याने माणदेशात फळ लागवड वाढली आहे बाजार समिती सौदे बाजारात डाळिंबाचे नियमित तर चिक्कू, पेरू, सीताफळ, सफरचंद, आंबा आदी फळ पिकांचे सौदे हंगामानुसार होतात. तालुक्यात ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे आज ड्रॅगन फ्रुटचे सौदे सुरू करण्यात आले. मंगळवारी सांगोला तालुक्यातील महुद येथील शेतकरी वैभव वसंत लवटे यांच्या दर्जेदार ड्रॅगन फ्रुट फळाला प्रति किलो १२१ रुपये दर मिळाला. डाळिंब सौदे बाजारात माण तालुक्यातील भालवडी (शिंगणापूर) येथील अजय सुभाष काटे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो २५१ रुपये, नातेपुते (जि. सोलापूर) येथील बाबुराव पानसकर यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो . २१० तर दिघंची (ता.आटपाडी) येथील मधुकर शिवदास शेटे यांच्या डाळिंबाला १५० रुपये दर मिळाला.

बाजार समिती सौदे बाजारात विविध फळांचे सौदे आता नियमितपणे होऊ लागले आहेत.बाजार समिती सौदे बाजारात शेतकर्‍यांच्या मालाला रास्त भाव मिळत आहे.मालाची सुरक्षितता आणि खुल्या पध्दतीने पारदर्शक पद्धतीने सौदे होत असल्याने सांगली,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी या सौदे बाजारास पसंती देत आहेत.