महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनवाणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखीव ठेवला असून हा निर्णय केव्हाही जाहीर होऊ शकतो. दरम्यान, हा निर्णय कोणाच्या बाजूने लागू शकतो यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेही बंडखोरीच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंना वाटत असलेल्या भीतीबाबत दावा केला आहे. “शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची भीती भाजपाला वाटत असेल, असं मला वाटतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >> “भाजपाकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता”, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा; म्हणाले, “मोदींच्या बुडत्या बोटी…”

Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले

जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला धक्का देत शिवसेनेत बंडखोरी केली. शिवसेनेतून २५ आमदार घेऊन त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला. हळूहळू त्यांच्या गटात ४० आमदार सहभागी झाले. या ४० आमदारांना घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. दरम्यान, यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात वादळी युक्तीवाद झाला. दोन्ही गटाचे युक्तीवाद आता संपले असून सुनावणीही पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला असून तो केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परंतु, यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा >> अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देताना म्हणाले, “ही चर्चा…!”

“जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर काय करायचं, असा प्रश्न आहे. आकडे पाहिले तर फडणवीस आणि उर्वरित शिंदे गटाकडे एकूण १४९ आमदार असतील. उर्वरित शिंदे गटातील हे आमदार स्वगृही जातील का अशी भीती असू शकते. परंतु, १६ आमदार निलंबित झाले तर सभागृहाची सदस्यसंख्या २८८ हून कमी होईल. त्यामुळे मध्यबिंदू १३६ होईल. जवळपास १५० आमदार या गटाकडे असल्यास यांना धोका नाही. याचा अर्थ असा की खरंच गंभीर हालचाली सुरू असत्या तर उर्वरित शिंदे गटाचे आमदार पक्षांतर बंदी कायद्यात अडकायला नको म्हणून उद्धवजींच्या पक्षात सामील होतील, अशी भीती त्यांना (भाजपाला) वाटत असेल, असं मला वाटतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.