कोविड -19 च्या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले असल्याचे सांगत, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी आज खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी अमित देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये, यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private medical colleges should not increase tuition fees this year amit deshmukh msr
First published on: 27-10-2020 at 18:23 IST