स्थापत्य अभियांत्रिकी पेपर फुटीच्या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर पुणे विद्यापीठाने आता पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. तसेच अभियांत्रिकीच्या पेपर तपासणीतील गोंधळाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठामार्फत १२ नोव्हेंबर रोजी स्थापत्य अभियांत्रिकीचा ‘सेंट ऑफ मटेरियल’ या विषयाचा पेपर घेण्यात आला होता. पेपर सुरू होण्याआधीच ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर त्याची प्रश्नपत्रिका फिरत असल्याचे उघड झाले होते. या बाबत तक्रारी आल्यास चौकशी केली जाईल असे विद्यापीठाकडून सांगितले जात होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत पेपर फुटीचे प्रकरण आणि पेपर तपासणी प्रक्रियेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. पेपर तपासणीतील गोंधळाचा फटका नऊ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे. यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करू, असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune university will launch complaint about paper leak
First published on: 19-11-2014 at 02:46 IST