Bachhu Kadu on Mahayuti: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांनी सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापैकी कुणाशी युती-आघाडी करावी, याबद्दल चर्चा केली. यावर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू सारखे लोक महायुतीत नकोत, अशी भूमिका घेतली. तसेच बेताल विधान करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने आता दूर ठेवावे, असेही ते म्हणाले.

“बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. त्यांचे दिव्यांगाचे धोरण मान्य केले. तरीही सरकारशी प्रतारणा करून त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना पुन्हा महायुतीत सामील करण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. साहजिकच हा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. पण बच्चू कडू यांच्यासारख्या बेताल, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा घेतले जाईल, याची शक्यता कमीच वाटते. सरकारचे पाठबळ घेऊन सरकारचाच विश्वासघात करणारे बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नये, अशी आमची मागणी आहे”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे बेताल व्यक्ती – विखे पाटील

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे) पराभव झाल्यानंतर आता नेत्यांकडून आता स्वबळाचा नारा दिला जात आहे. आगामी निवडणुकीत मविआला सोडून स्बळावर निवडणूक लढवू, अशी मागणी काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. आपला जनाधार राहिला नाही, हे विरोधकांनी मान्य करायला हवे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलत होते, तशी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. इतके बेताल विधाने करणारा माणूस मी पाहिला नव्हता. याचा धडा आता लोकांनी त्यांना शिकवला आहे.

हे वाचा >> चार वेळा अचलपूरचा गड राखला, यंदा कुठे चुकलं? पराभवानंतर बच्चू कडूंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले…

ईव्हीएमवर खापर फोडणे चुकीचे

विधानसभेत पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. याबद्दल बोलताना विखे म्हणाले, लोकसभेत तुम्हाला इतके घवघवीत यश मिळाले. महायुतीची पिछेहाट जाली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमवर प्रश्न का नाही उपस्थित केला? त्यांच्या खासदारांनी राजीनामा द्यायला हवा. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निकाल दिला आहे. जर विजय झाला तर ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला तर ईव्हीएम वाईट, अशी ही गत आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, तुम्ही जनादेश गमावलेला आहे. तुम्ही अनेकांचे वाटोळे केले आहे. आता आणखी जनतेचे, राज्याचे वाटोळे करू नये, त्यांनी शांतपणे घरी बसावे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

हे वाचा >> “मराठा मुख्यमंत्री असेल तर…”, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटं काय चर्चा झाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू यांची भाजपावर टीका

“गरज सरो वैद्य मरो, असा अजेंडा भारतीय जनता पक्षाने वापरू नये. जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता. तसेच आजचं चित्र वेगळं राहिलं असतं. त्यामुळे ही जी किमया आहे ती किमया एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असं करेल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदासंदर्भातील दावेदारी योग्य आहे”, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.