scorecardresearch

Premium

“२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका

काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे.

radhakrushna wikhe patil prithviraj chavan
राधाकृष्ण विखे पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावं लागलं. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं. सरकार पडलं नसतं आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवली असती. तसेच, २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आले असतं. भाजपाचं सरकार आलेच नसते,” असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं.

Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
Raksha Khadase
“एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावं”, रक्षा खडसेंचं विधान चर्चेत, म्हणाल्या, “वरच्या पातळीवर…”
Former Maharashtra CM Ashok Chavan
भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत, तरीही मौन! दोन दिवसांत भूमिका स्पष्ट अशोक चव्हाण
sharmistha mukherje and Rahul Gandhi
“काँग्रेसने नेतृत्वाबाबत गांधी घराण्याच्या बाहेर…”, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचं परखड मत

हेही वाचा : “२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“मराठा आरक्षणाचा प्रश्नही मी सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी मी निर्णय घेतला होता. सरकार राहिलं नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकलं नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवलं असतं,” असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

“काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार”

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर विखे-पाटील म्हणाले, “सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही.”

“हल्ली चव्हाणांना विनोद का सुचतो, कळत नाही”

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता. पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असं म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : “मोदींनी मान्यता दिली नसती, तर घोडेबाजार झाला नसता”, चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पृथ्वीराज चव्हाणांमुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमाकांवर”

“पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊनच पाठवलं होतं. जर, आम्ही निवडणुका एकत्र लढवणार नव्हतो, तर सरकारमध्ये राहण्यात अर्थ नव्हता. चव्हाणांच्या काळातच आघाडीची लय बिघडली. आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली,” अशी टीकाही सुनील तटकरेंनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Radhakrushna vikhe patil attacks prithviraj chavan over congress govt collapse ncp ssa

First published on: 29-11-2023 at 13:11 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×