भाजपात पूर्वी साधू होते, आता संधीसाधू आहेत, असं विधान उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेड येथे झालेल्या सभेत केलं होतं. त्यांच्या या विधानावर राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. खरे संधी साधू हे उद्धव ठाकरे आहेत, असं ते म्हणाले. अहमदनगरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- VIDEO: “ही ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही…”

खरे संधीसाधू उद्धव ठाकरे आहेत. ते स्वत: भाजपाच्या मदतीने निवडून आले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन बसलात. एवढच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केलं. तेव्हा त्यांना शिवसैनिक आठवला नाही का? तेव्हा त्यांनी एका शिवसैनिकाला संधी द्यायला पाहिजे होती. ही संधी देण्याचं धारिष्ठ त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे मी म्हणजे शिवसैनिक, मी म्हणजे शिवसेना, हे सांगणं आता त्यांना बंद करावा, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांता तिलांजली दिली आहे, असं प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

हेही वाचा – “ज्यांना आपल्या मतदारसंघात साध्या मुताऱ्या…”, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. निर्णय तुमच्या बाजूने लागला असता, तर हाच निवडणूक आयोग तुमच्यासाठी चांगला असता, पण तुमच्या विरोधात निकाल लागल्याने तुम्ही आयोगाला पक्षपाती म्हणता, लोकशाही प्रक्रियेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे. तिचा सन्मान करायला शिका, असा सल्ला त्यांनी दिला.