जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. सेनगाव, कळमनुरी व वसमत तालुक्यांतील काही भागांत शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला प्रारंभ केला. काही भागांतील शेतकऱ्यांना मोठय़ा पावसाची अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची सोमवारी सकाळी घेतलेली एकूण नोंद ६५.५४ मि.मी. इतकी आहे.
जिल्ह्यातील शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले असताना गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व भागांत दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे वसमत तालुक्यातील पांगरा िशदे, पोतरा, सेनगाव तालुक्यातील कवठा, पानकनेरगाव, नरसी नामदेव परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
िहगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील काही परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. परंतु झालेला पाऊस चौफेर समाधानकारक नसल्याने अनेक भागांतील शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिलिमीटरमध्ये तर कंसात एकूण पडलेला पाऊस िहगोली १४.१४ (८२.१९), कळमनुरी १५.५८ (५०.५९), सेनगाव ३.३३(९९.३२), वसमत ४.७१(३६.१४), एकूण ६०.५५ तर आत्तापर्यंत झालेला पाऊस ६५.५४ मि.मी.अशी नोंद झाली आहे.