महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आलीय. रमजानच्या आधी राज यांची सभा झाली आणि त्यांनी काही आवाहन केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत ही सभा रमजान ईदनंतर घ्यावी ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Maratha Kranti Morcha, Coordinator,
नाशिकमध्ये वंचितकडून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मैदानात, औपचारिक घोषणा बाकी
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आलीय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती समोर आलीय. पण मनसेचे पदाधिकारी याच मैदानामध्ये सभा घेण्याबद्दल आग्रही असल्याने तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी केलीय.

शहरामधील इतर ठिकाणांचीही चाचपणी केली जात असून पर्यायी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज यांनी घोषणा केल्याप्रमाणा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल यावर मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला अशी पोलिसांची भूमिका आहे.