scorecardresearch

Premium

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “कोणी पैसे मागितले…”

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय.

raj thackeray
राज ठाकरे

वेदान्त-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प जाणे, हे राज्य सरकारचे अपयश आहे, म्हणत विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला, असा दावा सत्ताधारी शिंदे गट- भाजपाकडून केला जातोय. याच मुद्द्यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाहीये. हा प्रकल्प गुजरातला का गेला? या उद्योजकांना कोणी पैसे मागितले होते का? असे प्रश्न उपस्थित करत याबाबतची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी

solapur police commissioner marathi news, cp m rajkumar solapur marathi news
पोलीस आयुक्त एम. राजकुमारांनी डिजिटल फलकांची गर्दी हटविली, सोलापूरच्या सार्वजनिक सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई
loksatta analysis protection of wildlife
विश्लेषण: ‘समृद्धी’मुळे बदललेल्या वाटा वन्यजीव स्वीकारतात का?
Devendra Fadnavis on AI
राज्य सरकारचा गुगलबरोबर करार, विविध क्षेत्रात AIचा वापर वाढणार, मग रोजगार घटणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Rahul Narwekar on NPC FActions
राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल कधी लागणार? राहुल नार्वेकरांचं दोन शब्दांत उत्तर, म्हणाले…

औद्योगिक क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाहीये. नेमकं कोठे बिघडलं याची चौकशी होणे गरजेचे आहे. या उद्योजकांकडे पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यायलाच पाहिजेत. पण महाराष्ट्रात आलेले उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

हेही वाचा >>> अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

१९९९ ते २००४ या काळात बीएमडब्ल्यूचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. तेव्हा विलासराव देशमुख यांचे सरकार होते. बीएमडब्ल्यूची सर्व लोक महाराष्ट्रात आली होती. त्यांची मंत्रालयात बैठक होती. मात्र महत्त्वाचे काम आल्यामुळे विलासराव देशमुख त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्या बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. यातील काही अधिकारी दाक्षिणात्य होते. जेव्हा उद्योग येतो तेव्हा पायाभूत सुविधा लागतात. त्याविषयीच या बैठकीत बोलणे सुरू होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अडचणींचा पाढा सुरू केला. त्यामुळे आम्ही निघतो असे बीएमडब्ल्यूचे अधिकारी म्हणाले. नंतर महाराष्ट्रात येणारा बीएमडब्ल्यूचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

हेही वाचा >>> २०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसला सोबत घेऊ नये…”

येणाऱ्या उद्योगांवर आपलं लक्ष नसेल तर आपल्याकडे कोण आणि का येईल? उद्योगातून रोजगार निर्मिती किती होतेय, हे पाहणे गरजेचे आहे. आपण महाराष्ट्रातून उद्योग घालवतोय यापेक्षा दुसरं दुर्दैवी काहीही नाही. गुजरातकडून चांगली सुविधा दिली जात असेल, तर फॉक्सकॉनचा कारखाना तिकडे का जाणार नाही? असा सवालही त्यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray comment on vedanta foxconn project said maharashtra government is not serious about industry sector prd

First published on: 19-09-2022 at 13:21 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×